खाली आपण Shahu Maharaj information पहाणार आहोत काही महत्वाचे पॉईंट्स दिले आहेत ते नक्कीच वाचा
- 1918 साली महाराजांनी महार वतने आणि बलुतेदारी व वेठबिगारी प्रथा बंद केली त्याचबरोबर आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा संमत केला.
- डॉ आंबेडकर यांच्या मूकनायक व आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी आर्थिक सहकार्य केले होते.
- 1901 सालामध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये ‘ गोहत्या प्रतिबंधक कायदा ‘ लागू केला.
- 1908 साली अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वसतिगृह स्थापन केले ?
- 1901 साली शाहू महाराजांनी ” व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची” स्थापना केली.
- ब्रिटिश यांच्याविरोधात शिवाजी क्लब एक क्रांतिकारी संघटना कोल्हापूर येथे शाहू महाराजांनी स्थापन केली.
- यशवंत जयसिंगराव घाटगे ) हे शाहू महाराजांचे मूळ नाव होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा आणि न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी , यासाठी क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय घेतले.
आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू करून मागासवर्गीय आणि दलितांची मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कसून प्रयत्न केले.
गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत दोन एप्रिल १८९४ रोजी खास दरबार भरवून त्यामध्ये शाहू महाराजांचे राज्यारोहण झाले.
शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील नोकऱ्यांमध्ये मागासलेल्या जाती-जमातीच्या लोकांसाठी ५० टक्के राखीव जागा ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय २६ जुलै १९०२ रोजी घेऊन तो प्रत्यक्ष राबविण्यास सुरवात केली. ब्राह्मण, प्रभू, शेणवी, पारशी या जाती वगळता इतर सर्व जातींना त्यांनी आरक्षणाचा लाभ दिला होता.
१९०८ मध्ये त्यांनी कोल्हापूरमध्ये दलितांसाठी वसतिगृह सुरू केले. त्यासाठी ‘विद्याप्रसारक मंडळी’ नावाची संस्था स्थापन केली भास्करराव जाधव त्याचे प्रमुख होते.
छत्रपती शाहू महाराजांचा १९०६ चा निवडक आदेश सांगतो, की कोल्हापुरात चर्मकार, महार आदी समाजातील मंडळींसाठी एक रात्रीची शाळा होती. २८ नोव्हेंबर १९०६ च्या आदेशान्वये ती कायम केली. चार ऑक्टोबर १९०७ च्या एका आदेशान्वये कोल्हापुरातील चर्मकार व ढोर समाजातील मुलींच्या शाळेसाठी मंजुरी देण्यात आली. तसेच त्या शाळेसाठी दरसाल रुपये ९६ खर्चाची तरतूदही संस्थानच्या स्त्री शिक्षणाच्या अंदाजपत्रकात केली. तसेच वडगाव येथे महार, मांग समाजासाठी शाळा सुरू केली होती; तसेच ढोर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या रात्रीच्या शाळेची मुदतही वाढविली होती.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या राहण्या-जेवणाच्या सोयीसाठी वसतिगृहे सुरू करण्याच्या विचारातूनच त्यांनी १४ फेब्रुवारी १९०८ रोजी ‘मिस क्लार्क हॉस्टेल’ची स्थापना केली. या वसतिगृहातील एक विद्यार्थी दत्तोबा संतराम पोवार हे कोल्हापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे चेअरमन होते. दत्तोबा पोवार हे शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक होते. त्यांनी १९१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी परिचय करून घेतला होता. याच दत्तोबांनी डॉ. आंबेडकरांविषयी महाराजांना सांगितले. दलित समाजातील एक तरुण मुलगा शिक्षण घेऊन तयार झाल्याचे ऐकून महाराजांना आनंद झाला. त्या दोघांची भेट १९१९ मध्ये झाली. दोघांचे स्नेहबंध दृढ झाले.
दलितांची बाजू जनतेसमोर आणि भारत दौऱ्यावर आलेल्या साऊथबरो समितीसमोर मांडण्यासाठी डॉ. आंबेडकरांना वर्तमानपत्राची गरज भासू लागली. ही बाब बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी महाराजांच्या कानावर घातली आणि वर्तमानपत्र सुरू करण्याची योजना त्यांच्यासमोर ठेवली. महाराजांना ही योजना पसंत पडली आणि त्यांनी वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी तत्काळ अडीच हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यातूनच ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ पाक्षिक सुरू झाले.
बाबासाहेबांनी अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद ३० व ३१ मे १९२० रोजी नागपुरात भरवली.
परिषदेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी स्वीकारावे यासाठी बाबासाहेबांनी महाराजांना ११ मे १९२० रोजी पत्र लिहिले. या पत्रात डॉ. आंबेडकर म्हणतात… ‘‘नागपूरच्या परिषदेस हुजूरचे येणे झाले नाही तर आमचा सर्वनाश होईल, आमचा व्यूह ढासळणार. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी जर आपला आधार व टेकू मिळाला नाही तर काय उपयोग? आक्कासाहेबांप्रमाणे आम्ही आपली लेकरे नव्हेत काय? आपल्याशिवाय आमचा कोणी वाली आहे काय? आणि आम्ही किती काळपर्यंत आजारी आहोत हे आपल्यास सांगावयास नको…आपल्या लडीवाळ अस्पृश्य लेकरास वर येण्यास हात द्यावा.’’
आणि महाराजांनी विरोध होत असतानाही त्या परिषदेत आपली हजेरी लावली